नवी दिल्ली | कृषी विज्ञान केंद्रांच्या धर्तीवर महाराष्ट्रात पशुधन जास्त असणाऱ्या भागात पशु विज्ञान केंद्र तर समुद्र किनारी भागात मत्स्य विज्ञान केंद्र उभारण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी नवी दिल्ली येथे आयसीएआरच्या ८९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली. यावेळी केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते.