मुंबई | नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन व कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना सन २०१७-१८ चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सहभाग असलेल्या महिला महोत्सवाचे ८ ते ११ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.