मुंबई | एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राधिका जगन्नाथ चव्हाण यांनी जागतिक वैद्यकीय क्षेत्रात गगणभरारी घेतली आहे. राधिका मूळची बीड जिल्ह्याची रहिवाशी असून औरंगाबाद येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. तर एम.डि.मेडिसीन के.ई.म. महाविद्यालय मुंबई येथे झाले.
सुपर स्पेशेलाईगेशन (डी.न.बी.गॅस्ट्रो -इन्ट्रोलॉजि ) आशियन इंस्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रो इन्ट्रोलॉजि हैदराबाद येथून देशात द्वितीय येण्याचा मान मिळवला नुकतीच त्याची भारताची एकमेव प्रतिनिधी म्हणून जगातील अमेरीका, जपान, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, फ्रान्स ,जर्मनी , इंग्लैंड , व्हियत्नाम येथील डॉक्टरांना संबोधन करण्यासाठी भारताची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.