मुंबई | जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टीच इन इंडिया’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज मुंबई येथे केले.
आयआयटी मुंबईचा ५९ व्या वर्धापनदिन आणि साठाव्या वर्षात पदार्पण केल्यानिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, संचालक मंडळाचे अध्यक्ष दिलीप संघवी, संचालक प्रा.देवांग खक्कर, माजी संचालक, विद्यार्थी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.