मुंबई | आर्थिक सहयोग व विकास संस्थेने ( ओईसीडी) २०१४ साली पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या एकूण संशोधकांच्या संख्येनुसार रँकिंग जाहीर केली आहे. ‘ओईसीडी’ च्या अहवालानुसार जगातील १५ देश हे पीएच.डी पदवीधारकांच्या संख्येत आघाडीवर आहेत. सन २०१४ या वर्षात भारतात सर्व विषयातील मिळून पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यांची संख्या ही २४ हजार ३०० इतकी असून जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे.