मुंबई | अमेरिकेत १५ ते २० मार्चमध्ये होणा-या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये डाॅ. राधिका चव्हाण ह्या भारताच्या वतीने प्रतिनिधीत्व करणार आहे. अत्यंत कमी वयात त्याना भारताची प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली असून, अमेरिकेत होणा-या जागतिक आरोग्य परिषदेत भारतातून त्या एकमेव महिला डाॅक्टर असतील.
परिषदेत त्या अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, चीन, लंडन, पोलंड, कॅनडा, आयर्लंड, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया या देशांना वैद्यकीय मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या आरोग्याविषयक सुधारणा हा परिषदेचा मुख्य हेतू असून ‘पोट आणि पोटाचे विकार’ या विषयावर डाॅ. राधिका चव्हाण मार्गदर्शन करतील.
“ग्रामीण भागात तांड्यासारख्या ठिकाणी राहून खूप जिद्दीने उच्चशिक्षण घेतले. मला भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ही माझ्या जीवनातील सर्वात सुखद बाब आहे. आई-वडीलांचे सहकार्य, अनेक गुरुजनांचे मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले. सद्या स्पर्धेच्या युगात जगतांना तरुणांमध्ये ग्रामीण भागाचा असा न्यूनगंड असतो, ग्रामीण भागातील तरुणही अडचणीवर मात करुन यशाची मजल मारु शकतो. “
डाॅ. राधिका चव्हाण