मुंबई | हिंजवडी येथे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या भूखंडावर इमारती बांधून रहिवाशांची फसगत केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह ९ आरोपींवर गुन्हे दाखल असून आवश्यकता असल्यास जलदगती न्यायालयात या प्रकरणाचा खटला चालविला जाईल, अशी माहिती नगरविकास तथा गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.