मुंबई | कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना करून प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यासंदर्भात आज विधानमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.