मुंबई | कामगार विभागाच्या अधिनस्त कार्यालयात महिलांकरिता स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याच्या सूचना कामगार विभागाच्या सर्व अधिनस्त कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. कारखाने अधिनियमानुसार सर्व कार्यालयांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास त्या आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.