मुंबई | ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या विद्यमाने मुंबईतील सांस्कृतिक शहर डोंबिवली येथे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात ५ वे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष भिमणीपूत्र मोहन नायक असतील तर उद्घाटन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. माजी मंत्री मनोहर नाईक, माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ, आमदार प्रदीप नाईक, आमदार, डाॅ. तुषार राठोड, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२९ व ३० मार्च असे दोन दिवसीय साहित्य संमेलन आहे. साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार प्राप्त ‘सेन सायी वेस’चे रचनाकार डाॅ. प्रा. वीरा राठोड यांचेही या संमेलनात बोलीभाषेवर सत्र आहे. वास्तुशास्त्रज्ञ मिलिंद पवार बंजारा; लोकजीवन आणि मुलतत्व ह्या विषयावर आपले विचार प्रकट करतील. याप्रसंगी देशातील शेकडो साहित्यिक, लेखक, कवी, गीतकार, भजनकार यांची उपस्थिती असेल. त्याचबरोबर जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतचे बंजारा समाज बांधव याठिकाणी उपस्थित असतील.