मुंबई | आॅल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने ५ वे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन डोंबिवली स्थित सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाले. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भिमणीपूत्र मोहन नाईक होते. उद्घाटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. देशभरातील शेकडो साहित्यिक या संमेलनात उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष भिमणीपूत्र मोहन नाईक यांनी बंजारा इतिहासवर प्रकाशझोत टाकत अध्यक्षीय भाषणात म्हणाले
” बंजारा साहित्य ही वैश्विक पातळीवर समग्र मानवी उत्थानाचा मार्ग दाखवते म्हणून ही साहित्यकृती अग्रस्थानी आहे.
दोन दिवशीय साहित्य संमेलनात विविध सत्र पार पडले. बंजारा परिसंवाद या सत्रात तर दुसरे सत्र बंजारा कविता आणि गीतगायणाने पार पडले यात बंजारा काव्याची मैफिल जमली या सत्रात राज्यभरातील कवी लेखक उपस्थित होते. तृतिय आणि अंतिम सत्र अर्थातच विचारवेध या सत्रात मिलिंद पवार यांनी बंजारा समुदाय आणि मूलतत्वे या विषयावर विवेचन केले. तर प्रा. वसंत चव्हाण यांनी बंजारा संस्कृती आणि साहित्य यावर संबोधन केले.