ठाणे | शहापूर तालुक्यात शिक्षणाची वारी ही कसारा, वाशाळा आणि अजनुप या तीन केंद्रातील शाळासाठी आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये या तिन्ही केंद्रातील शाळांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी.तसेच सर्व विभागांचे केंद्र प्रमुख आणि विभागातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिक्षणाच्या भरपूर शैक्षणिक प्रकल्प होते.पण प्रमुख आकर्षण ठरले ते वाशाळा केंद्रातील व जिल्हा परिषद शाळा वाशाळा येथील प्रकल्प. टाकाऊ पासून टिकाऊ व विविध शैक्षणिक साहित्य वाशाळा शाळेतील पुंडलिक सासे सर यांनी सादर केले.तसेच वाशाळा केंद्रात प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन द्वारा जो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणकाद्वारे गणित,भाषा,इंग्रजी व इतर संगणकीय ज्ञान प्रकल्प उल्लेखनीय होता.सदर प्रकल्पाचे सादरीकरण टीम लिडर दिगंबर धानके यांनी उत्तम रित्या केली.सदर प्रकल्पाची स्तुती आलेल्या पाहुण्यांनी केली.
प्रथम इन्फोटेकचा संगणकीय शिक्षण प्रकल्प सर्वच केंद्रात राबविण्यात यावा अशी विनंती इतर शाळेतील केंद्रप्रमुखांनी केली. सदर प्रकल्प हा फक्त वाशाळा केंद्रातील ग्रामीण आदीवासी भागात २२ शाळेत राबविण्यात येत आहे. प्रथम इन्फोटेक चा प्रकल्पाला अर्थ साह्य B.P.C.L या कंपनीने केले आहे.
ग्रामीण आदीवासी भागातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात कशी गगनभरारी घेऊ शकतात हे वाशाळा विभागाने शहापूर मधील सर्वच शाळांना दाखवून दिले आहे.