मुंबई | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबईच्या शिष्ठमंडळाने घेतली मुंबई विद्यापीठाचे रजिस्टार दिनेश कांबळे यांची भेट. मुंबई विद्यापीठाने ७ एप्रिल पर्यंत सर्व शाखांचे प्रलंबित निकाल लावावेत अशी मागणी अभाविपने केली. विद्यापीठ जर ७ तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरले तर अभाविप मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरुध्द तीव्र आंदोलन करेल. यावेळी महानगरमंत्री रवी जयस्वाल, योगेश देशपांडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते