मुंबई | प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये कलिंगडच कलिंगड दिसू लागले आहेत. कलिंगड खाल्ल्याने उन्हामुळे शरीरातील कमी झालेले पाण्यावर आणि अवेळी लागण्याऱ्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण फेकून देतो. मात्र, कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बियाही आपल्या शरीरास फायद्याच्या असतात.
कलिंगडासोबत बियाही खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो. कलिंगड भरपूर प्रमाणात खा जेणेकरून उन लागणार नाही.