मुंबई | उन्हाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात तापलायं त्यामुळे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी लिंबू पाणी अतिशय महत्त्वाचं पेय आहे. उन्हात लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. एरवी सकाळी उठल्यावर सर्वसाधारणपणे आपण चहा अथवा काॅफी पीत असतो मात्र, उन्हाळ्यात याउलट होणे गरजेचे आहे. अधूनमधून आपल्या स्वास्थ्यकडे पाहणेही तेवढेच अनिवार्य आहे. लिंबू पाणीमुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे
१ ) प्रतिकारक शक्ती वाढते
लिंबू मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असते त्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीत वाढ होण्यास मदत करते. सी व्हिटामिनमुळे तुमचं तनाव सुद्धा कमी होते.
२) उर्जात वाढ होते
लिंबू पाणी पचनक्रियेस मदत करते. निराशा संपुष्टात आणून नवचैतन्य लिंबू पाण्याच्या सेवन केल्यावर होते. लिंबू पाण्यामुळे शरीरात उर्जेचा संचार होवून उत्साह वाढते.
३) जखमा भरल्या जातात
लिंबू पाण्यामुळे झालेल्या जखमा लवकर भरुन येतात. कुठे जर दुखापत झाली असेल तर यावर रामबाण उपाय आहे लिंबू पाणी.
४) सुंदर त्वचा राहते
प्रदूषणामुळे चेह-यावर अनेकप्रकारचे आक्रमण होत असतात. त्यामुळे त्वचेवर डाग, सरकुत्या, त्वचेचे आजार होतात. लिंबू पाण्यामुळे त्वचेच्या सर्वच व्याधीवर पूर्ण विराम लागते. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी लिंबू पाणी रोज प्यायला पाहिजे.