मुंबई | आपण ‘भीम अॅप’ वापरत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आजपासून कॅशबॅकची ऑफर्स मिळणार आहे. या ऑफर्स मधून ग्राहकांना एका महिन्याला ७५० रुपये आणि व्यावसायिकांना एक हजार रुपयांपर्यंत कॅश बॅक मिळू शकतो.
डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप लॉन्च केलं. अत्यंत कमी कालावधीत गूगल तेज, फोन पे आणि पेटीएमच्या स्पर्धेत भीम अॅप उतरलं. डिजिटल ट्रॅन्झॅक्शनमध्ये गेल्या काही काळात या अॅपने आता नवनव्या ऑफर्स दिल्या जात आहेत.