मुंबई | ओबीसी जनगणना होवून ओबीसी समाजाला संविधानिक न्याय मिळायला पाहिजे यासाठी ओबीसीचे नेते माजी खासदार विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्राभर संविधानिक न्याय यात्रेची सुरुवात केली आहे.
“जर का आपल्या देशातील प्राण्यांची, तृतिय पंथ्याची जनगणना होते तर मग ओबीसी समाजाची जनगणना का होत नाही. जोपर्यंत ओबीसी जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही.”
– हरिभाऊ राठोड, माजी खासदार तथा विद्यमान आमदार