मुंबई | शासकीय खरेदी प्रक्रिया सक्षम, दर्जात्मक आणि पारदर्शक व्हावी यावर यापुढे भर राहणार आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षणाद्वारे या प्रक्रियेत जागतिक मानांकनानुसार प्रणाली राबविणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (यूएसटीडीए) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.