नागपूर | वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या वसंतराव नाईक स्मृति सभागृहाचे आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. वसंतराव नाईक यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्याच मार्गावर राज्य सरकारची सुरु असलेली वाटचाल याचा उहापोह यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आणि कृषि ॲपचे लोकार्पण केले.
याप्रसंगी नागपूरच्या महापौर नंदा जिचकर, खासदार विकास महात्मे, आमदार गीरिष व्यास, आयुक्त अनुप कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.