नागपूर | संत तुकाराम महाराजांची गाथा पोहोचविण्याचे काम संताजी जगनाडे महाराजांनी केले आहे. समाजातील सर्व लोकांना एकत्रित करुन सर्वधर्म समभावाचे विचार त्यांनी समाजात रुजविले. अशा महान संताचे आचार-विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी १ कोटी रुपये देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तेली समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात दिली.