मुंबई | महाराष्ट्र राज्य स्थापन होवून ५८ वर्षे पूर्ण झालीत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला आजवर अनेक मुख्यमंत्री लाभले. आत्तापर्यंत राज्याला १८ मुख्यमंत्री लाभले पण एकही महिला मुख्यमंत्री लाभली नाही. फेसबुकवर आगामी महिला मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न राज्यभरात पेरण्यात आले आणि राज्यभरातून मराठी लोकांची मते घेण्यात आली.
यामध्ये राज्याच्या महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार सुप्रिया सुळे ह्या दोन्ही महिला नेत्यांना राज्यातून मते देण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे यांना ८१ टक्के तर सुप्रिया सुळे यांना १९ टक्के लोकांनी पसंती दिली.