नवी दिल्ली | भारतीय चित्रपटसृष्टीच्या अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार अर्थातच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होय. विज्ञान भवन येथे केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाच्या फिल्म समारोह संचालनालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष शेखर कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले. सैराटचे लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता अक्षय खन्ना, आणि नुकत्याच आलेल्या मोरक्या चित्रपटातील बालकलाकारांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.