मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सद्या कार्यकार्त्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. सोमवारपासून त्यांच्या दौरा रायगड जिल्ह्यात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भेट देणार आहेत.
पनवेल, पेण, कर्जत, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, अलिबाग, खोपोली, महाड, महाड, माणगाव या तालुक्याच्या ठिकाणी ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.