मुंबई | सहकारातून जनसामान्यांना आरोग्यसेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केले. विक्रोळी येथील शुश्रुषा को-ऑप. हॉस्पिटलच्या सुमन रमेश तुलसियानी या दीडशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून राम नाईक बोलत होते.