वाशिम | समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विविध प्रश्नांवर चर्चा करुन समाज प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस पाऊलं उचलणार असल्याची माहिती आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंह तिलावत म्हणाले. महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या तिलावत यांनी पोहरादेवी येथे एका सभेत आपले विचार मांडले.
याप्रसंगी उत्तमसिंग चव्हाण, अनिल राठोड, लचिराम महाराज, रामराव महाराज भाटेगावकर, बाबुसिंग नाईक, विरेंद्र आडे, संतोष चव्हाण, शंकर आडे यांची प्रमुख उपस्थिती होती.