मुंबई | दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. मंत्रालयाच्या नवीन प्रवेशव्दाराजवळील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. २७ वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना हिंसक आणि अतिरेकी कटामध्ये आपले प्राण गमवावे लागले.
आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोक्यात आणणारी परिस्थिती सोडविण्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा देणारे आहे. असे शिक्षणमंत्री विनोद तावडे याप्रसंगी म्हणाले.