मुंबई | गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण हे ४० टक्के आहे. येथील सोयी-सुविधा पाहता अनेक परदेशी उद्योजकांचीही महाराष्ट्रालाच पहिली पसंती मिळत आहे. प्रत्येक परदेशी शिष्टमंडळाने महाराष्ट्र हे गुंतवणुकीला सर्वोत्तम असल्याची पावती दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीनच्या शिष्टमंडळाला दिली.
चीन देशातील सिचुआन प्रांतातील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायची आहे, यासाठी शिष्टमंडळाने आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.