नागपूर | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे तसेच महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.