पुणे | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे येथे ३० मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेनेचा दीक्षांत संचलन कार्यक्रम, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन व मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास राष्ट्रपती महोदय उपस्थित राहणार आहेत.