मुंबई | महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समाज आदींनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘भारतातील मुलींचे जग -सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.