मुंबई | नेकतेच कर्नाटक मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकी मध्ये बंजारा समाजाचे एकूण ८ आमदार निवडून आले असून, समाजाने त्यांना भरपूर पाठींबा दिल्यामुळे बंजारा समाजाचे ८ आमदार निवडून आले आहे. या सर्व पक्षीय आमदारांचा सत्कार समारंभ मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय समोर मुंबई येथे ३ जून २०१८ रोजी दुपारी २ वाजता सत्कार आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मुंबईतील बंजारा समाजांनी,आयोजित केला असून, राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहरभाऊ नाईक, आमदार हरिभाऊ राठोड तसेच आमदार प्रदीप नाईक, समाजसेवक किसनभाऊ राठोड, तसेच महाराष्ट्रातील माजी मंत्री, माजी आमदार, तसेच इतर राज्याचे बंजारा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई व महाराष्ट्रातील, तमाम कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, कर्मचारी अधिकारी, व समाजप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.