जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तंबाखू विरोधी शपथेचे वाचन केले. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.