मुंबई | मिशन शौर्यमधील यशस्वी विद्यार्थ्यांना यशाबरोबर जबाबदारी वाढते व अंहकाराला दूर ठेवा असे सांगत मिशन शौर्यमधील विद्यार्थ्यांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. आज मुंबई येथे मिशन शौर्यमधील एव्हरेस्टवीरांचा गौरवसोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार ,आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा ,क्रिडामंत्री विनोद तावडे ,पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.