मुंबई | इंडियन प्रीमियर लीगमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने दिग्दर्शक, अभिनेता अरबाज खान यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याला आज शनिवारी २ जून चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. आयपीएलमध्ये देशात आणि परदेशात आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन सट्टे लावले जातात. नुकतेच ऑनलाईन सट्टा चालविण्या-या सोनू जालान याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या चौकशीच्या माहितीनुसार अरबाज खानचे नाव पुढे आले आहे.