ठाणे | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण आठवडाभर नेहरू युवा केंद्र ठाणे तसेच युनाटेड नेशन वॉलींटीर यांच्याकडून विविध उपक्रम राबवून पर्यावरण प्रदूषण रोखणे, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकबंदी, पाणी बचत असे अनेक सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम राबविले गेले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वयंसिद्धा फाऊंडेशन ला सोबत घेवून वनश्री पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष बुधाजी घोडविंदे, स्वयंसिद्धा फाऊंडेशनच्या माधुरी तारमले, अजित भालके यांच्या उपस्थितीत शहापूर येथील बस स्थानकावर युवकांना व उपस्थितांना प्लास्टिक न वापरण्याची शपथ दिली.
“प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरण दुषित होत आहे. म्हणून आम्ही शहापुरातील नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याची शपत घ्यायला लावली आहे.”
माधुरी तारमाळे, सामाजिक कार्यकर्त्या