मुंबई | महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाच्या गाईडलाईन शासनाने घोषित केल्या असून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी जमा करणे बंधनकारक आहे. जात पडताळणी ची प्रक्रिया ही किचकट असून महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वी प्रमाणे हे प्रमाणपत्र नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी घेवून अभाविप ने आज CET सेल आयुक्त आनंद रायते व तंत्रशिक्षण संचालनाय संचालक अभय वाघ यांच्या सोबत भेट घेतली.
ही सर्व प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार होणार असून यात सरकार व स्वतः कोर्ट हस्तक्षेप करू शकते त्यामुळे त्यांनी मार्गदर्शन केल्यावरच त्यात सुधारणा होणार असल्याने विद्यार्थी हित लक्षात घेता अभाविप या विषयात मार्ग काढण्यासाठी आज मा.शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असून त्यांनी या विषयात विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे यासाठी विनंती करण्यात येणार आहे असे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले.