इंदौर | राष्ट्रसंत म्हणून ख्याती मिळवलेल्या युवा आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी आपल्या राहत्या घरी स्वताःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराजांनी गोळी झाडल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना उपचारासाठी इंदौरच्या बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
आध्यात्मिक क्षेत्रात तर ते प्रसिद्ध होतेच पण त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय कार्यातही ते शक्रीय होते. राजकीय नेत्यांबरोबर त्यांचा स्नेहाचा संबंध होता. नुकतेच मध्य प्रदेश शासनाने त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याकडे पाहून राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून भय्युजी महाराज तनावाखाली होते यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ‘सुसाईड नोट’लिहून ठेवले आहे.