मुंबई | साप म्हटलं की कुणालाही घाम फुटतो. त्यात साप चावला म्हटल्यावर धडकीनेच अर्धा जीव जातो. काही लोक तर साप चावण्याआधीच ह्रदयविकाराने मरतात. डोंगराळ भागात राहणा-या लोकांना साप चावण्याची संख्या खूप आहे. किंबहुना सापाच्या दंशाने अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय. ज्या लोकांना डोंगराच्या भागात फिरण्याची सवय आहे अश्या लोकांना साप चावणे हे साहजिकच आहे. सापाचा विष मानवासाठी अत्यंत खतरनाक असू शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर लगेच उपचार केला नाही तर संबंधित व्यक्तीचे प्राण जाऊ शकते. रक्ताच्या माध्यमातून सापाचे विष पूर्ण शरीरात घुसून जाते. साप चावल्यानंतर माणूस प्रचंड घाबरुन जातो, त्यामुळे त्याला पुढे काहीच सुचत नाही.
चला, जाणून घेऊयात साप चावल्यावर काय करावे अन काय करु नये.
१) साप चावल्यावर न घाबरता तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी गेले पाहिजे
२) कुठल्याही प्रकारचे टाईट ब्रासलेट, हाताला धागा बांधला असेल शरीर सुजण्याआधी सोडून टाका.
३ ) सापाने चावल्यानंतर पाणी अथवा कुठलाही पेय अजिबात पिऊ नका
४) चुकनही सापाने चावलेल्या जागेवर तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करु नका त्यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो.
५ ) सापाने चावल्यावर अजिबात धावू नका, त्यामुळे विष उफाळून येऊ शकते.
६ ) चावलेल्या सापाचे रंग आणि त्वचा लक्षात ठेवा. जेणेकरून रुग्णालयात सांगता येईल.
७) चावलेल्या जागेवर हळद लावू नये किंवा मलमपट्टी करु नये.