दानात रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणून समजले जाते. मात्र, रक्तदान करण्यावरून आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे समाजात रक्तदात्यांची संख्या कमी आहे. खरतर रक्तदानाचे महत्वच माहित नसल्याने किंवा भीतीपोटी लोक रक्तदान करायला घाबरतात. त्यामुळेच अनेक जणांच्या तोंडून आपण ऐकत असतो, रक्तदान केल्यामुळे शरीर कमजोर होते. मात्र, रक्तदान केल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते.
रक्तदान केल्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे
१) हृदय विकाराचा धोका टळतो:
नियमित रक्तदान केल्यामुळे हृदय विकारावर सहज मात मिळवता येते. किंबहुना हृदय विकाराचा धोकाही टळतो.
२) लिव्हरच्या आजारापासून मुक्ती:
रक्तदान केल्यामुळे शरिरात आयरनची मात्रा वाढते. त्यामुळे लिव्हर, पोटाचे आजार होण्यापासून वाचवते.
३) कॅन्सरचा धोका टळतो:
नियमित रक्तदान केल्यामुळे शरीरातील नवीन पेशी निर्माण होतात त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता खूप मंदावते.
४) जखम लवकर भरुन येते:
तुम्ही नियमित रक्तदान करत असाल तर तुम्ही एखाद्यावेळी जखमी झाला असाल तर तुमचे घाव अथवा जखम यामुळे लवकर भरुन येते.
५) वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त:
धावपळीच्या युगात अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्या वजनावर याचा परिणाम जाणवतो. रक्तदान केल्यामुळे तुमच्या वजनात तारतम्य असेल.