सरीवर सरी असा घेऊनी तो आला
सरीमाग सरी तोही धावूनच आला
सरीतच किती जीव होता अडकला
सरीवानी सरी तरी कोंबूनच गेला
सरी आली दारी कशी छेडूनच गेली
सरी माझी सखी बघा जीवलग झाली
सरीवानी नाही कोणी जपले मनाला
सरीनेच खरी जुनी ओळख ही झाली
सरीचेच शब्द आज आले माझ्या ओठी
सरीचे ते बोल घुमते या माझ्या कानी
सरीने जगण्या केली मरणाची बोली
सरीतच जीव माझा होतो वर खाली
सरी कशा सरी ऐकत त्या माझे नाही
सरीतच जीव एकटाच माझा बाई
सरीला या आता कशी समजावू तरी
सरीचेच नाव कसे समोर झाले गं बाई
– चैताली राऊत