मुंबई | शिवसेनेचे नेते तथा सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. याविषयी शासनाकडून कोणतीही औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र सिद्धिविनायक न्यासाचे ते अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
होम मिनिस्टर या सुप्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहचलेल्या बांदेकर यांनी शिवसेनेच्या वतीने माहिम विधानसभा लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आले होते. दरम्यान, बांदेकर यांनी कोकणात पक्ष वाढीसाठी संघटनात्मक कामे केली.