मुंबई | दरवर्षीप्रमाणे निकालात गोधळ न होता लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. सुहास पेडणेकर यांना केली. दरवर्षी निकाल उशिरा लागत असल्यामुळे अभाविपने खबरदारी घेत विद्यार्थ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आज अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरु पेडणेकर यांना निकाल लवकर लावण्यात यासंदर्भात निवेदन दिले.
दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसात मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यात येतील असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डाॅ. सुहास पेडणेकर यांनी दिले आहे. याप्रसंगी कोकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ आणि विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.