पोट साफ ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे व्ययक्तिक काम आहे. मात्र दिवसात अनेकदा पोट साफ करत फिरणे किंवा त्यासाठी कुठल्याही ठिकाणी हागायला बसणे हे एक आजार असू शकतो. होय, या आजाराला ‘सीरियल पूपर’ असे म्हणतात. एका ठिकाणी हागण्याच्या सवयीमुळे आरोग्य चांखले राहते. मात्र, याउलट कुणी जर खुल्या जागेवर वारंवार हागत असेल तर यामुळे त्याला ‘सीरियल पूपर’ आजार जडलयं अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक लोकांना स्वच्छतागृह न सापडल्याने अश्या व्यक्ती आपलं पोट रिकामं करण्यासाठी कुठल्याही ठिकाणी हागायला बसतात. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाला एकाच महामार्गावर ३० वेळा घाण केल्यामुळे अटक करण्यात आली होती. त्यामुळे ‘सीरियल पूपर’ आजाराची व्याप्ती कळू शकते.
कोलंबियातील एका व्यक्तीने अनेक महिने घरातील स्वच्छतागृह न वापरता सार्वजनिक ठिकाणी हागण्याचा धुमाकूळ घातला होता. शेवटी त्याला पोलिसांनी अटक केली. यामध्ये काही लोकं तर असे असतात त्यांना लोकांच्या बाथरुम वापरण्याची सवय लागलेली असते. आपल्या देशातही अनेकांना उघड्यावर हागण्याची सवय आहे. त्यामुळे ‘सीरियल पूपर’ आजारकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.