मुंबई | आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. जो कोणी प्लास्टिकच्या पिशव्या वापरतांना आढळून येईल त्याला ५००० ते २५००० पर्यंत रक्कम दंड म्हणून भरावे लागतील. यासंदर्भात शासनाने संबंधित कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे. दरम्यान यापुढे नागरिकांनी प्लास्टिकची पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले आहे.
यावर आहे बंदी
- प्लास्टिकच्या पिशव्या
- प्लास्टिकचे चमचे
- प्लास्टिकचे कप, भांडी
- थर्माकोलच्या वाट्या, ताट, ग्लास
- थर्माकोलचे सजावटीच्या वस्तू
या वस्तूंवर बंदी नाही
- रेनकोट
- नर्सरीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक
दुधाच्या बाटल्या
- शेतीचे सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक
- टिव्ही, फ्रिज, कुलर यासाठी वापरण्यात येणारे थर्माकोल
- बिस्किटे, वेयफर यांच्या पुढ्यावरचे प्लास्टिक