पुणे | छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ ही संस्था निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल आणि रोजगाराबरोबरच मानव संसाधनाची निर्मिती करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
पुण्यात स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती होते.