मुंबई | तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत देशात आणीबाणी लावण्यात आली. १९७५ साली लादलेल्या आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने देशभरात काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मुंबईतही भाजपाच्या वतीने मोठ्या उत्साहात काळा दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी आणि काॅग्रेस पक्षावर सरसंधान केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तर इंदिरा गांधींची तुलना चक्क जर्मीनीचा हुकूमशहा अॅडाॅल्फ हिटलर याच्याशी केली होती.
दरम्यान, आणीबाणीवर भाजपा जोरात टिकास्त्र करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाना साधलाय. ‘लोका सांगे’ या व्यंगचित्राच्या माध्यमातून निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे, उद्योगपतीना मोदी पायदळी तुडवतोय असे व्यंगचित्र राज ठाकरेंनी साकारलं आहे.