‘नेमिची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कोसळून गेला. दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाची चांगलीच सुरुवात होणार आहे यात तीळमात्र शंका नाही. पाऊस सुरु होण्याआधीच प्रत्येकाच्या घरात आरोग्याच्या बाबतीत तक्रार होताना दिसते. यासाठी आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्यामुळे अनेकदा आजार होतात त्यामुळे सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.
ताप, खोकला, सर्दी यासारखे छोटे-मोठे आजार फक्त पावसात भिजल्यामुळे होतात. अनेकदा ओले कपडे अंगावर राहिल्यामुळेही या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्यतो पावसात जास्त वेळ भिजू नका. या ऋतूत डांसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे डेंगी, मलेरिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या घराला, आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ ठेवा.
पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे
१) कोल्ड ड्रिंकचा मोह टाळावा.
२ ) बाहेरच्या उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळा.
३) हलके व पौष्टिक आहार आपल्या दैनंदिन जेवणात घ्या.
४) जास्तीत जास्त शुद्ध पाणी प्या
५ ) पावसात जास्त वेळ भिजू नका, ओले कपडे परिधान करु नका. जेणेकरून त्वचारोग होणार नाही.