मुंबई | मुंबईतील ब्रिटिशकालिन स्टेशन एलफिन्स्टन स्टेशनचे नाव बदलले जाणार असून १८ जुलै २०१८ पासून या स्टेशनचे प्रभादेवी असे नाव असणार आहे. १८५३ते १८६० मध्ये बाॅम्बे प्रेसिडेंटीचे गव्हर्नर लाॅर्ड एलफिन्स्टन यांचे नाव देण्यात आलं होतं. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या उद्घोषणेत, इंडिकेटर आणि टिकटवर एलफिन्स्टन रोड ऐवजी प्रभादेवी नाव असे बदल होणार.
दरम्यान शिवसेनेकडून एलफिन्स्टन रोड स्टेशन नाव बदलून प्रभादेवी नाव देण्यात यावे यासाठी मागणी होती. यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते आणि खासदार अरविंद सावंत सातत्याने प्रयत्नशील होते.