आरोग्यशास्त्रात दूधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना दुधाला अन्नाएवढेच महत्त्वाचे समजले जाते. दूधात कॅल्शियमचे घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडाच्या मजबूतीसाठी दूधाचे सेवन अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे नियमित दूध प्यायल्याने आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
नियमित दूध पिण्याचे फायदे
१) शारीरिक क्षमतेत वाढ
जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या कमकुवत असाल तर दूध पिल्याने तुम्ही सदृढ होऊ शकता. दुधात कॅल्शियम असल्याने शारिरीक ताकद वाढण्यास मदत होते.
२) उत्तम झोप लागण्यास मदत
अनेकदा कामाच्या तनावामुळे झोप येत नाही अश्यात दुधाचे सेवन अधिक लाभदायक ठरु शकते. रात्री झोप जर येत नसेल तर दूध घ्या. त्यामुळे तुम्हाला सहज झोप लागेल.
३ ) स्मरणशक्ती वाढते
दूधाचे नियमित सेवन केल्यावर स्मरणशक्ती वाढते आणि मन स्थिर राहण्यास मदत होते.
४ ) खोकल्यावर रामबाण उपाय
तुम्हाला जर खोकला झाला असेल तर यावर दूध रामबाण उपाय आहे. गरम दुधात थोडं हळद टाकून प्यायल्याने खोकला बरा होतो.