नागपूर | आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नागपुरात बांधण्यात येणारे सभागृह कधी बांधणार असा तिकट सवाल आमदार सुनील केदार यांनी विधान भवनात केले. नगरविकास मंत्री रणजित पाटील यांनी विधान सभेत दिलेला शब्द पाळला नाही.
दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात केदार यांनी नाईकांचे सभागृह नागपूर येथे उभारण्यात यावे यासाठी मागणी केली होती. काॅग्रेसच्या काळात वसंतराव नाईक सभागृह मंजूर करण्यात आला होता. मात्र युतीच्या सरकारने अद्यापही सभागृहाचे काम करण्याची मानसिकता दिसून येत नाही. अशी बोचरी टीका केदार यांनी भाजपा सरकार केली आहे.